बेडकिहाळ येथे श्री राम मूर्ती प्रतिष्ठान निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन

सोमवार (ता 22) जानेवारी रोजी अयोध्या येथे होत असलेल्या श्री राम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना या ऐतिहासिक कार्यकमा निमीत्य आत्ता पासूनच एकंदरीत सर्व वातावरण श्री राम नामाच्या जयघोषात वाहून निघाले असून बेडकिहाळ येथील समस्त राम भक्त व भाविकांच्या

 

वतीने ग्राम दैवत श्री कल्याण सिद्धेश्वर मंदिरात या समंधी नुकतेच युवक मंडळ,तसेच दसरा महोत्सव कमिटी यांची बैठक घेण्यात आली.सुनील नारे, डॉ गोपाळ महामुनी, आर जी डोमणे, मलगौडा पाटील,सागर केसरकर, तात्यासाहेब केस्ते, संजय पाटील, अशोक आरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकी प्रसंगी सोमवार (22)

 

जानेवारी हा दिवस म्हणजे भारतीयांच्या दृष्टीने भाग्याचा व महत्वाचा असून या दिवशी अयोध्येतील श्री राम मंदिरात श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. तर या निमीत्य बेडकिहाळ येथे 22 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता बेडकिहाळ सर्कल ते सिद्धेश्वर मंदिरा

 

पर्यंत श्री राम प्रतिमेची विविध वाद्याच्या गजरात.भव्य मिरवणूक काढन्यात येणार आहे.तर सकाळी 10 वाजता सिद्धेश्वर मंदिरात विधिवत्त पणे पूजा, मंत्रपटन, व सामूहिक राम जप कार्यक्रम होणार आहे. 11 च्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी

 

7 नंतर घरोघरी व गावांतील सर्व मंदिरातून दिपोस्तव साजरा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर युवकांच्या वतीने गावांतील मंदिर स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तर विशेष म्हणजे हा दिवस समस्त गावकऱ्यांनी एक प्रकारे आपला एक सन उत्सव या प्रमाणेच साजरा करा असे आवाहन या वेळी करण्यात आले.

 

या वेळी मलगौडा पाटील, सागर केसरकर, प्रमोद कुलकर्णी, महादेव माळिये, सचिन पाटील, आदींनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाच्या नियोजना बद्धल माहिती सांगितली. या बैठकी प्रसंगी कल्लिनाथ चौगुले, संजय चौगले,अभिनंदन बेनाडे, विलास थरकार,

 

विजय देसाई, विष्णू पाटील, शिवराज चौगुले, पोपट आंबी, महावीर पाटील, संदीप पाटील, राजू जयाप्पगोळ, चंदू कुंभार, संदीप चव्हाण, धनंजय माळी अशोक सुभेदार, रमेश गाडवे, अविनाश पाटील, मौनेश सुतार, यांच्यासह गणेश युवक मंडळाचे कार्यकर्ते, व दसरा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशांत सुतार यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन वाडेकर यांनी आभार मानले.

Spread the love
error: Content is protected !!