समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांचे योगदान मोलाचे : पोलीस निरीक्षक सत्यवान हाके

समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांचे योगदान मोलाचे : पोलीस निरीक्षक सत्यवान हाके
शिरोळ पोलीस ठाण्याच्यावतीने पत्रकारांचा सत्कार

शिरोळ / प्रतिनिधी

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारांच्यामुळे समाजातील दीनदुबळ्या घटकांना न्याय मिळतो आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यातही त्यांचे योगदान मोलाचे असते पोलीस प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणूनही पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय आहे मौलिक विचार शिरोळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी व्यक्त केले.

 

शिरोळ पोलीस ठाण्याच्यावतीने शिरोळ शहरातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभ पार पडला या सत्कार समारंभात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे बोलत होते.

 

शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर.पाटील,उपाध्यक्ष बाळासाहेब माळी,सचिव डॉ. दगडू माने,खजिनदार चंद्रकांत भाट,कोल्हापूर जिल्हा वेल्फेअर रिपोर्टर्स असोसिएशनचे शिरोळ तालुकाध्यक्ष

 

महेश पवार,जेष्ठ पत्रकार सुनील इनामदार,आनंदा शिंगे, सुरेश कांबळे,संभाजी जाधव,संदीप इंगळे यांचा डायरी, पेन,गुलाब पुष्प देऊन पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पोलीस हवालदार

 

दिलीप कुंभार यांनी स्वागत केले.पत्रकार डॉ दगडू माने डी आर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!