कलाशिक्षक बाबासाहेब कुंभार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभ

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची ज्ञानगंगा बाबासाहेब कुंभार यांनी सतत वाहती ठेवली – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

शिरटी / प्रतिनिधी

माणूस एखाद्या सेवेमध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्याचे निवृत्तीचा वेळ ठरलेला असतो गेल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ज्यावेळी मागे वळून पाहतो त्यावेळी खऱ्या अर्थाने हा सत्कार सोहळा असेल किंवा निरोप समारंभ असेल कुंभार यांनी ३६ वर्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन हे आजच्या कार्यक्रमाने होत आहे.अतिशय गरीब कुटुंबातून जन्माला येऊन सुद्धा या शाळेच्या सुरुवातीला शाळा विना अनुदानित तत्त्वावर असल्याने विना वेतन काम केले अशा कठीण परिस्थितीत देखील कुंभार यांनी आपले कर्तव्य बजावले,त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कुंभार यांना तालुकास्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत मिळालेल्या पुरस्काराची यादी खूपच मोठी आहे असे गौरवोद्गार
शिरटी हायस्कूलचे कलाशिक्षक बाबासाहेब कुंभार यांच्या सेवानिवृत्ती सत्कार व सदिच्छा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब खवाटे हे होते,
प्रारंभी दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हटले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक यांनी केले मानपत्राचे वाचन अध्यापिका एस,एम,पोतदार यांनी केले यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते बाबासाहेब कुंभार यांना शाल व श्रीफळ तसेच मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कुंभार यांनी आपल्या ३६ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन सेवानिवृत्त होत असताना एक आदर्श कलारत्नाचा सत्कार व सदस्य सोहळ्यास ज्ञानदीप शिक्षण संकुलाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेस देणगीही दिली,यावेळी विद्यालयातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कुंभार यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक एस,ए,रोडे व अध्यापिका एम,एस,पुजारी यांनी केले या कार्यक्रमास शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,राहुल यादव, सौरभ शेट्टी, संस्थेचे संचालक महावीर चौगुले कलगोंडा पाटील,कल्लाप्पा खवाटे,बापूसो पाटील,कुबेर चौगुले, जयपाल शिरगावे,एन,जे,पाटील,शंकर रोजे,आप्पासो मगदूम, सूर्यकांत उदगाव,अण्णासो सुतार,आनंद शिंगे, अशोक चौगुले,विपुल कोगनोळे, राहुल चौगुले,दादा भगाटे, संजय सुतार,सचिन रामसिंग, उदय सुतार,प्रकाश कुंभार, महावीर शिरगावे,किशोर देसाई,पांडुरंग पोळ,श्रीधर लोहार, राजेंद्र कुंभार,गणपती कुंभार,बाळासो कुंभार, राहुल सुर्यवंशी,सह गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी, अध्यापक अध्यापिका अध्यापके तर सेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते शेवटी आभार अध्यापिका एस,के,पाटील यांनी मांडले,

Spread the love
error: Content is protected !!