शिरोळ तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा
शिरोळ / प्रतिनिधी
२४ डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.मात्र सदर दिवशी कांही अपरिहार्य कारणामुळे होऊ शकले नाही.त्यासाठी तालुक्यातील विविध ग्राहक संघटनेने आवाज उठवला होता.त्याची दखल घेत ८ जानेवारी रोजी शिरोळ तहसीलदार अनिलकुमार हेळकर
यांनी संबंधित विभागास पत्र काढून ग्राहक दिन हा प्रबोधनात्मक साजरा करायचा असलेने संबंधित विभाग प्रमुख उपस्थिती रहाण्याचे सुचना केली होती.त्यानुसार येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ८ जानेवारी रोजी ग्राहक दिन साजरा करण्यात आला.
सुरूवातीस स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर विभाग प्रमुखांनी शासनाच्या विविध योजना व आपल्या विभागाकडील कामकाजाबाबत माहीती सांगत उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा संघटक सदाशिव आंबी,
तालुकाध्यक्ष-डॉ.मेहबुब बागवान,अखिल भारतीय ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष राजेश शंभुशेट्टे,ग्राहक कल्याण फौंडेशनचे अध्यक्ष सुभाष माळी,डॉ.एस.ए.पाटील यांनी ग्राहकांच्या समस्या बाबत आपले विचार व्यक्त करुन ग्राहकांना कायद्याचे अपुरे ज्ञान असल्याने संबंधित विभागानी त्याबाबत आपल्या कार्यालयात शासकीय
योजनेची बोर्ड लावावेत असे विनंती केली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी ग्राहक दिनामुळे सर्वसामान्यांचे समस्या समजून घेणे सोयीचे होते त्यामुळे ग्राहक संघटनेचे अभिनंदन केले.यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे “ग्राहक बिंदू”स्मरणिका तहसीलदार यांना
देण्यात आली. कार्यक्रमास गटविकास अधिकारी शंकर कवितके,वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदकुमार बनगे,उपअभियंता सार्वजनिक बांधकामाचे तुषार शिरगुप्पे,भुमि अभिलेख डॉ.स्वप्नजा मेंडके,आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर, व्यासपीठावर होते.तर तालुक्यातील ग्राहक संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राहक पंचायतीचे रमेशकुमार मिठारे यांनी केले तर आभार सदाशिव आंबी यांनी मानले.