मुंबई / प्रतिनिधी
कोल्हापूर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांना तर हातकणंगले मधून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली.या बैठकीस जेष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावेत अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.कोल्हापूर मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांना तर
हातकणंगले मधून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्याअशी मागणी बैठकीत करण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मतदार संघाच्या आढावा घेण्यात
आला. यावेळी कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघा बाबतीतचा अहवाल मांडताना जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीस मिळावेत,अशी मागणी केली. उमेदवारीबाबत बोलताना पक्ष संघटना बळकटी व
वाढीसाठी कोल्हापूर मतदार संघासाठी व्ही.बी.पाटील हेच योग्य उमेदवार आहेत,असे सर्वानी सुचवले.त्याच बरोबर हातकणंगले मधून प्रतीक जयंत पाटील यांचे नाव सुचवले.