आयुष्यात शाळेचे,आई-वडिलांचे,गावाचे नाव मोठे करा – इंद्रजित माने

आपल्या कामामध्ये सातत्य ठेवा,आईवडिलांचा आदर करा,त्यांचा मान राखा,पाणी जपून वापरा कारण भविष्यात पाण्याची खूप गरज लागणार आहे.विविध कौशल्ये आत्मसात करा व आयुष्यात पुढे जात असताना

 

स्वत:बरोबर शाळेचे,आईवडिलांचे,गावाचे नाव मोठे करा असे मत मा.इंद्रजित माने यांनी व्यक्त केले.साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित हेरवाड हायस्कूल हेरवाडचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच मोठ्या

 

 

उत्साहात पार पडला,त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावसाहेब उर्फ दा.आ. पाटील होते.या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते हास्य सम्राट पैलवान भारत पाटील यांचा हसा पण जोरात हा कार्यक्रम अतिशय विनोदी आणि अतिशय

 

 

हास्यमय वातावरणामध्ये पार पडला.कार्यक्रमास साने गुरुजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कनवाडकर, सरपंच सौ.रेखा अर्जुन जाधव व ग्रामपंचायत सदस्या, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान,

 

 

चित्रकला व रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे झाली.रोपास जलार्पन करून प्रार्थनेने सुरुवात झाली.स्वागत व प्रास्ताविक कु.लक्ष्मी सोलापुरे हिने तर पाहुण्यांच्या परिचय कु.तनुजा पाटीलने करून दिला.यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती

 

माणिक नागावे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच विद्यालयातील विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांचा हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.विद्यालयाचा अहवाल कु.प्रतिक्षा वाघे,

 

सांस्कृतिक विभागाचा अहवाल कु.कोमल कुन्नुरे,क्रीडा विभागाचा अहवाल कु.आदिती माने,देणगीदारांची माहिती कु.समिक्षा पुजारी,पारितोषिक वितरणाचे वाचन कु.साक्षी व श्रावणी पाटील यांनी केले.हास्यसम्राट पैलवान भारत पाटील यांनी आपल्या विनोदी भाषणाने

 

विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत हसवत ठेवले.शेवटी आभार कुमार किरण कुंभार याने मानले.यावेळी पालक,ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
error: Content is protected !!