महाशिवरात्री कृष्णा वेणी यात्रा संबधी गाव सभा घ्यावी

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

कुरुंदवाड शहरात परंपरेप्रमाणे साजरी होणारी महाशिवरात्री कृष्णा वेणी यात्रा येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत असून याबाबत पालिका प्रशासन मुख्याधिकारी यांनी गाव सभा घेऊन संबंधित गावातील तरुण मंडळी सेवाभावी संस्था तसेच यात्राठिकाणचे शेतकरी यांची संयुक्त बैठक बनवून याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

यावेळी बोलताना कृती समितीचे सुनील कुरुंदवाडे म्हणाले कुरुंदवाडची ही ऐतिहासिक यात्रा दरवर्षी भरवण्यापूर्वी कायम गोंधळ स्थिती असते याही वर्षी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी याबाबत यात्रा तोंडावर आली तरी कोणताच निर्णय घेतलेला नाही पालिका प्रशासन यात सहभाग घेणार आहे,का नाही याबाबत संभ्रमावस्था आहे.

 

तरी पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन कारण सध्या मुख्याधिकारी हेच नगराध्यक्ष आहेत यांनी पुढाकार घेऊन गाव सभा घेत सर्वांना विश्वासात घेऊन याबाबत त्वरित निर्णय घेऊन यात्रा चांगल्या प्रकारे भरण्यासाठी प्रयत्न करावेत,कृती समितीचे आप्पा भोसले म्हणाले ही प्रसिद्ध यात्रा आसपासच्या खेडेगावातील लोकांना उपयोगी

 

पडणारी तसेच व्यापारी शेतकरी सर्वसामान्य जनता यांना मनोरंजन आणि आर्थिक फायदा देणारी आहे यात्रा ज्या ठिकाणी भरते तेथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ही यात्रा पूर्वीप्रमाणे भव्य प्रमाणात घडवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावे

 

यावेळी कृती समितीचे सिकंदर सारवान अभय पाठुकले अजय भोसले वैभव घोरपडे राजू देवकाते संदीप डोंगरे स्वप्निल श्री धनकर आर्षद बागवान अभिजीत पवार आदी  उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!