अक्षरदासोह योजनेतील महिला कर्मचाऱ्यांना एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा

अक्षरदासोह योजनेतील महिला कर्मचाऱ्यांना एक दिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा

13 गावांतील 250 महिला कर्मचारी उपस्थित

बेडकिहाळ  / प्रतिनिधी

येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी एस संयुक्त पदवीपूर्व कॉलेजच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात कर्नाटक सरकार व जिल्हा पंचायत बेळगांव व चिक्कोडी अक्षर दासोह योजना यांच्या वतीने मध्यान्ह आहार योजनेत कार्यरत असलेल्या कर्मचारी महिलांना एक दिवशीय मार्गदर्शनपर (पुनरचेतना) कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी एस हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.बी.जनवाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अक्षर दासोह योजनेचे निर्देशक एम.टी.जनगौडर,समाज सेवक व जेष्ठ योगा मार्गदर्शक नाना गौडा पाटील.गुरुजी (कमत्यानहट्टी) हे उपस्थित होते.शिक्षिका श्रीमती हणुमव्वा भुताले योजना समन्वयक संदीप पाटील, सदलगा अन्न पूर्णेश्वरी गॅस केंद्राचे प्रमुख संतोष वाली, नेज हायस्कूलचे मुख्याधयापक सी एम् सुखसारे, सदलगा अग्नी शमन केंद्राचे एस एन कोरे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वाणी कंचीबैल, मंगल हणबरट्टी, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरवात प्रार्थना गीताने झाली.तर श्रीमती भूताले व इतर महिलांच्या हस्ते श्री शिवशंकर, अन्नपूर्नेश्वरी फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर नानागौडा गुरुजी यांनी कार्यक्रमाला चालना दिली. अध्यक्ष व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक अनिल मालगत्ती यांनी केले व कार्यक्रमाचा उद्देश समजाऊन दिला. या प्रसंगी व्यासपिठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार बेडकिहाळ संयोजक यांच्या वतीने शाल श्रफळ देऊन करण्यात आला.याप्रसंगी नाना गौडा पाटील गुरुजी म्हणाले आपण बनवत असलेल्या अक्षर दासोह योजनेतील जेवणास प्रसादाचे स्वरूप प्राप्त झाले पाहिजे.जेवण बनविताना आपल्या मनात शुध्द व पवित्र भाव असेल पाहिजेत.तर आपण आपल्या घरातील सर्वांच्या साठीच जेवण बनवत आहोत.ही भावना असणे महत्वाची आहे.तर जेवण ग्रहाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.तसेच या वेळी सदलगा अग्नि शमन केंद्राचे मारुती देसाई व शंकर कोरे यांनी जेवण बनवीत असताना अचानक आग लागली तर तातडीने घेण्याचे निर्णय व आग विजविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या उपाय योजना या विषयी माहिती सह प्रात्यक्षिक करून दाखविले. तर संतोष वाली यांनी सिलेंडर गॅस योग्य रित्या हताळण्याची माहिती दिली.अध्यक्ष एम बी जनवाडे यांनी हि उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास बेडकिहाळ,शमनेवाडी,सदलगा,नेज,शिरगांव,गळतगा, भोज, कारदगा, शिरगांव, मानकापूर,बोरगांव, शिरदवाड, एकसंबा,आदी गावांतील 250 पर्यंत मध्यान्ह आहार बनविणाऱ्या महिला उपस्थित होत्या.सूत्रसंचालन ए व्ही मालगत्ती यांनी केले तर आभार शरद हेब्बाळे यांनी मानले.

Spread the love
error: Content is protected !!