उदगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ८ व ९ जानेवारीला

उदगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा ८ व ९ जानेवारीला

शिरोळ / प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरोळ च्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उदगाव येथे संपन्न होणार आहे.सोमवार दि.८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता खासदार धैर्यशील माने व आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शुभहस्ते होणार आहे.श्री दत्त साखर कारखाना शिरोळ चे चेअरमन उद्यान पंडीत गणपतराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.गट विकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदिप पाटील, गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,क्रीडा विभागप्रमुख नारायण पाटील,सौरभ पाटील, मुख्याध्यापक शंकर जंगम,स्कूल कमिटीचे चेअरमन व सदस्य,केंद्र प्रमुख यशवंत पेठे,सर्व केंद्रप्रमुख,शिक्षक संघटना प्रतिनिधी,शिक्षक बँक व पतसंस्थाचे चेअरमन व संचालक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचे नियोजन पुढील प्रमाणे -सोमवार दि. ८जानेवारी रोजी लहान गट सांघिक खो खो व कबड्डी स्पर्धा उदगाव येथे पार पडतील.तर मोठा गट वैयक्तिक धावणे -१००,२००, ४००,६०० मीटर,लांब व उंच उडी, गोळा व थाळी फेक,कुस्ती -४०,४५,५०कि.ग्रॅ. व४x१०० रिले केंद्रीय शाळा दत्तनगर दत्त कारखाना शिरोळ येथे होतील.मंगळवार दि.९जानेवारी रोजी मोठा गट सांघिक खो खो, कबड्डी,लहान गट वैयक्तिक धावणे -५० व१०० मीटर,लांब व उंच उडी,कुस्ती -२५,३०,३५ कि.ग्रॅ.या स्पर्धा उदगाव येथे होणार आहेत.बक्षिस वितरण ज्या त्या दिवशी संध्याकाळी करणेत येईल.स्पर्धेचे संयोजन चिपरी केंद्र करीत आहे.

Spread the love
error: Content is protected !!