कुरुंदवाड येथील शिवसेना शहर कार्यालयात पत्रकार दिन साजरा

कुरुंदवाड / प्रतिनिधी
समाजातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक आणि एखाद्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत वृत्त प्रसिद्ध करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी  पत्रकारिता ही मोठा आधारस्तंभ आहे.प्रिंट मीडियाच्या साथीला इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील आज तात्काळ आणि शिग्र एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याची
बातमी प्रसारित करून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाला खडबडून जागी करणारी पत्रकारिता समाजामध्ये सध्या सुरू आहे.म्हणून देशातील नागरिक हा पत्रकारितेमुळे निर्भय असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी केले. कुरुंदवाड येथील शिवसेना शहर कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पत्रकार दिनानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,माजी तालुकाप्रमुख संजय अनुसे आदी प्रमुख उपस्थित होते.यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख पाटील म्हणाले पत्रकार राजकीय विश्लेषण आपल्या बातमीतून करत असताना त्याचा समाजाला कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून ते करत असतात पत्रकारांनी आजपर्यंत समाज हिताच्या बातम्या लावून कुरुंदवाड शहरांमध्ये पत्रकारितेचा एक धबधबा निर्माण केला आहे.प्रशासन आणि राजकीय नेते कोणतेही कार्य करत असताना पत्रकारांना सोबत घेऊनच करतात असे सांगितले.यावेळी पत्रकार इजाज खान पठाण,अनिल केरीपाळे,आनंदा शिंगे,बाबासाहेब मोरे,सुरेश कांबळे,राजगोंड पाटील,रवींद्र केसरकर,सतीश पाटील,रमेश सुतार,तुकाराम पवार,नंदकुमार सुतार,उत्तम भोई,संदीप इंगळे,जमीर पठाण आदी पत्रकार उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!