शिरोळ येथे पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार,अभिनेते डॉ दगडू माने यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

शिरोळ येथे पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार,अभिनेते
डॉ दगडू माने यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक व आद्यपत्रकार वंदनीय बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त शनिवारी ६ जानेवारी पत्रकार दिन सर्वत्र साजरा झाला.शिरोळमधील राजर्षी शाहू विद्या मंदिर नंबर १ या शाळेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करून शहरातील पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी कोळी यांनी शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकारिता कला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते व सिनेअभिनेते डॉ. दगडू श्रीपती माने यांनी या शाळेच्या जुन्या आठवणी सांगत माजी विद्यार्थी म्हणून शाळेविषयी जिव्हाळा व्यक्त केला. त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाळेला पाठवलेल्या पत्रातील मजकुरा प्रमाणे माझी शाळा , माझी जबाबदारी….या उपक्रमांतर्गत शाळा ,गाव परिसराची स्वच्छता ठेवावी. बालचमूनी शिक्षणातून ज्ञान , विज्ञानाची झेप घेताना गुरुवर्य शिक्षक आणि आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी जोपासावी असा सल्ला दिला. शिवाय शैक्षणिक संकुलाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे अशी भूमिका मांडत पत्रकार डॉ. दगडू माने यांनी काही गंमतीदार किस्से ,विनोद सांगून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.त्यामुळे शनिवारी सकाळच्या शाळेला आणखीन उत्साही वातावरणाचा आनंदोत्सव लाभला.

Spread the love
error: Content is protected !!