धनवडे कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला…बाबूराव धनवडे पतसंस्था निवडणूकीसाठी ५१ % मतदान

बाबूराव धनवडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे निवडणूकीत ५१ % मतदान

सोसायटी नंतर पतसंस्था निवडणूकीत धनवडे कुटुंबातील संघर्ष चव्हाटय़ावर

नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध बाबुराव धनवडे सहकारी ग्रामीण पतसंस्थेची निवडणूक लागली होती.संस्थेचे चेअरमन कै. प्रकाश धनवडे यांच्या निधनानंतर पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती नाचूक बनली होती.त्यात प्रकाश धनवडे यांचे चिरंजीव डॉ.प्रविण धनवडे,प्रशांत धनवडे आणि अनंत धनवडे,सागर धनवडे,प्रताप धनवडे याच्यात संस्थेच्या आर्थिक परिस्थिती,इमारत लिलाव वरून वादावादी, तक्रारी झाल्या होत्या.त्यानंतर संस्थेची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले.यामध्ये डॉ.प्रविण धनवडे यांच्या नेतृत्वाखाली कै.प्रकाश बाबूराव धनवडे पॅनेल विरूध्द माजी उपसरपंच अनंत धनवडे, सागर धनवडे, प्रताप धनवडे, संतोष धनवडे यांच्या नेतृत्वाखाली बाबूराव धनवडे बचाव पॅनेल मार्फत निवडणूक लढविण्यात आली.आज दत्त हायस्कूल, विद्या मंदिर येथील चार केंद्रावर दिवसभर मतदान प्रकिया पार पडली. 855 मतदाना पैकी 469 सभासदांनी मतदान केले. 386 सभासदांनी मतदानाकडे पाठ फिरवली.आज दिवसभर जयसिंगपूर येथील धनवडे गट आणि नृसिंहवाडीतील धनवडे गटाचे बूथ एकमेकांना लागून होते. सभासदांनी मतदान करण्यासाठी घेवून येण्यासाठी दोन्ही गटाकडून इच्छा सुरू होती.दरम्यान श्री दत्त विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत ही धनवडे कुटुंबातील संघर्ष चव्हाटय़ावर आला होता.त्यानंतर बाबूराव धनवडे पतसंस्थेच्या निवडणूकीत दोन्ही धनवडे कुटुंबातील गट एकमेकांसमोर आल्याने नवा संघर्ष बघायला मिळाला आहे. या निवडणुकीत माजी उपसरपंच अनंत धनवडे, मराठा क्रांती मोर्चाचे सागर धनवडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर युवा सेनेचे प्रतिक धनवडे यांनीही निवडणुकीत विजयासाठी जोरदार तयारी केली आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते संतोष धनवडे दिवसभर मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. तर डॉ. धनवडे यांनी हि आपल्या वैयक्तिक पातळीवर प्रचार यंत्रणा सांभाळली आहे.शनिवारी मतमोजणी होणार आहे.बारा वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्यात येतील.दरम्यान शुक्रवार मतदान आणि शनिवारी मतमोजणी असल्याने दोन दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक खूश असले तरी पालक वर्गातून नाराजीचे सूर उमटले आहेत.

Spread the love
error: Content is protected !!