‘बातमी महत्वाची’ पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी
कोल्हापूर / प्रतिनिधी
पंचगंगा व भोगावती नद्यांच्या दोन्ही तीरावरील नमूद केलेल्या भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश जारी केले आहेत.भोगावती नदी – कार्यवाहीचा भाग- राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही तीरावरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात दिनांक 8 ते 9 जानेवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.पंचगंगा नदी – कार्यवाहीचा भाग- पंचगंगा नदीवरील ‍शिंगणापूर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याखाली ते शिरोळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत दोन्ही तीरावरील भागात ‍मिळणाऱ्या सर्व ओढ्या व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तिरावरील भागात  दिनांक 10 ते 11 जानेवारी 2024 या दोन दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात आली आहे.उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन    परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रदद् करण्यात येईल  व होणा-या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही. आदेश महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976,कलम 51(3) व 97 मधील तरतुदीनुसार असलेल्या अधिकारान्वये देण्यात आला आहे.
Spread the love
error: Content is protected !!