लाटवाडी / प्रतिनिधी
जिल्हा परिषद कोल्हापूर,शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ यांचे विद्यमाने अब्दुललाट केंद्रामार्फत विद्या मंदिर लाटवाडी येथे शिरोळ तालुकास्तरीय कलाविष्कार सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदिप पाटील, गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,नारायण पाटील,सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल ओमासे,सरपंच शितल अवघडी,केंद्र प्रमुख सलीम आत्तार,केंद्र मुख्याध्यापक गजानन धनगर, संजय निकम,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेघा खोत,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
(लहान गट)
समूहगीत – केंद्र नांदणी-कन्या यड्राव प्रथम,केंद्र अ.लाट -वि.मं. पाटील मळा द्वितीय,केंद्र चिपरी -कन्या वि.मं.उदगाव तृतीय.
समूहनृत्य – केंद्र नांदणी -कन्या नांदणी प्रथम,केंद्र दत्तनगर -कन्या वि.मं.नंबर २ शिरोळ द्वितीय,केंद्र चिपरी -कन्या चिपरी तृतीय.
नाटयीकरण – चिपरी-कुमार वि.मं.जैनापूर प्रथम,अ.लाट – कन्या वि.मं.शिरदवाड द्वितीय,दत्तनगर -छत्रपती शिवाजी वि.मं.शिरोळ तृतीय. कथाकथन- हसूर -कन्या वि.मं.घालवाड प्रथम,नांदणी -वि.मं. आडकेवाडी द्वितीय,दत्तनगर -कन्या वि.मं.नं.२ शिरोळ तृतीय. प्रश्नमंजुषा – अकिवाट -वि.मं.राजापूरवाडी प्रथम,हसूर- कुमार वि.मं.कुटवाड द्वितीय,दत्तवाड- कन्या वि.मं. हेरवाड.
मोठया गटातील निकाल पुढीलप्रमाणे –
समूहगीत – अ.लाट -वि.मं. लाटवाडी प्रथम,नांदणी -कन्या वि.मं. यड्राव द्वितीय,उर्दू शिरोळ -उर्दू वि.मं.उदगाव तृतीय.
समूहनृत्य – शेडशाळ-वि.मं. गणेशवाडी माळ प्रथम,अ.लाट -वि.मं.आर.के.नगर यड्राव द्वितीय,चिपरी -कन्या वि.मं. निमशिरगाव तृतीय. नाटयीकरण – दत्तवाड- वि.मं. टाकळीवाडी प्रथम, अकिवाट-वि.मं.राजापूर द्वितीय,नांदणी -कन्या वि.मं. यड्राव तृतीय.
कथाकथन – शेडशाळ-वि.मं.गणेशवाडी माळ प्रथम,दानोळी -वि.मं.कवठेसार द्वितीय.नांदणी -कुमार वि.मं.यड्राव तृतीय. प्रश्नमंजुषा – नांदणी-वि.मं. हरोली प्रथम,शेडशाळ-वि.मं. नृसिंहवाडी द्वितीय,दानोळी -वि.मं.कवठेसार तृतीय.
स्पर्धेच्या यशस्वी करण्यासाठी अ.लाट केंद्रातील केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,ग्रामपंचायत लाटवाडी,ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य लाभले.