शिरोळ / प्रतिनिधी
येथील राजश्री शाहू विद्या मंदिर क्रमांक १ येथे तसेच विद्या मंदिर धाकटे आगर या दोन्ही शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीतर्फे साजरी करण्यात आली.
शिरोळ येथील राजश्री शाहू विद्यामंदिर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या सावित्रीच्या लेकींचे जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या पदाधिकाऱ्यांकडून औक्षण करण्यात आले.
तसेच शाळेतील शिक्षकांना व पालक यांना जायंटस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीतर्फे दिनदर्शिका वाटप करण्यात आले
तसेच धाकटे आगर येथील शाळेत १०० विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले.यासाठी जायंटस् ग्रुप दुर्गा सहेलीच्या उपाध्यक्षा सौ.वीणा चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी जायंटस् फेडरेशन समन्वयक डॉ. सौ. स्नेहल कुलकर्णी,फेड.स्पेशल ऑफिसर सुधिर कुलकर्णी जायंटस् ग्रुप दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा सौ.अश्विनी नरूटे, माजी अध्यक्षा सौ.संगीता जाधव,सौ.नलिनी देसाई,
सौ. कुसुम जगदाळे,सौ.अनुराधा वेल्हाळ राजश्री शाहू विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.आशा शहापुरे,विद्या मंदिर धाकटे आगरच्या मुख्याध्यापिका सौ.सीमा कुलकर्णी दोन्ही शाळांचे शिक्षक उपस्थित होते.