सुरेखा खेताणी यांचे वतीने दत्तवाडच्या जिल्हा परिषदेच्या मुलांना स्कूल बॅग्ज,शालोपयोगी साहित्य भेट
दत्तवाड / प्रतिनिधी
दत्तवाडचे सरकार श्रीमंत भवानीसिंह घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नाने मुंबई येथील भगवान महावीर यांच्या शिष्या व सामाजिक कार्यकर्त्या प्राची शेठ (खेताणी) यांचे स्मरणार्थ सुरेखा महेंद्रभाई खेताणी यांच्या वतीने”मायेची ऊब”उपक्रमांतर्गत स्कूल बॅग्ज, शालोपयोगी साहित्य व
खाऊ वाटप सुरेखा महेंद्रभाई खेताणी यांचे शुभहस्ते करण्यात आले.आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांमध्ये स्कूल बॅग्ज,शालोपयोगी साहित्य व स्वेटर अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.कुमार विद्या मंदिर व विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाडच्या मुलांना स्कूल
बॅग्ज,शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप तसेच समाजातील गरजू व गरीब महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे कीट स्वरूपात मदत करण्यात आली.याप्रसंगी उषा घेवडे,CFOI चे अध्यक्ष आशिष घेवडे,मितेश घेवडे,
शार्दूल गरगटे,अॅड.युवराज घोरपडे,उपसरपंच अकबर काले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप वडर,उपाध्यक्षा आरती कांबळे,सदस्य नामदेव चव्हाण, शितल बंकापूरे,मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,
मुख्याध्यापिका सुनिता खटावकर,काका पुजारी,महावीर कांबळे,ज्योस्ना सुतार,सूरज माने,सौरभ जाधव,सोमनाथ जाधव,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.