शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विनोद पुजारी तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे यांची निवड

अजित मांगुरकर सचिव संतोष तारळे खजिनदार
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी उपाध्यक्षपदी बाळासाहेब कांबळे सचिवपदी अजित मांगुरकर आणि खजिनदारपदी संतोष तारळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश सुतार यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार संघाची बैठक पार पडली या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड आणि पत्रकार दिन समारंभाचे नियोजन करण्यात आले.नूतन कार्यकारणीमध्ये अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी (नृसिंहवाडी),उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे (शिरोळ), सचिव- अजित मांगुरकर (जयसिंगपूर), खजिनदार संतोष तारळे (हेरवाड), कार्यकारणी सदस्य – संभाजी जाधव (धरणगुत्ती),चंद्रकांत भाट (शिरोळ),संतोष बामणे (उदगाव),सुरेश कांबळे(शिरटी),अतुल भोजने (जयसिंगपूर),संदीप बावचे (शिरोळ), नागेश गायकवाड (कुरुंदवाड),गणेश शिंदे (जयसिंगपूर) तर कायम निमंत्रित सदस्यपदी विजय पवार,सुनील इनामदार, आनंदा शिंगे,बाळासाहेब माळी,डी.आर.पाटील,डॉ.दगडू माने, आप्पालाल चिकोडे यांची निवड करण्यात आली.पत्रकार दिनानिमित्त शिरोळ तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता संजय सांस्कृतिक हॉल शिरोळ – नृसिंहवाडी रोड नुसिंहवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.पंचायत राज व ग्रामविकास भारतीय जनता पार्टी सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.शेळी-मेंढी कुक्कुटपालन व्यवसायासंदर्भात मंजुनाथ कामगौंडा (इंडी),प्रगतशील शेतकरी नारायण साळुंखे (सावळगी) यांचे ऊस उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे.तसेच पत्रकारांचे आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात येणार आहे.स्वागत व प्रास्ताविक बाळासाहेब माळी यांनी केले.विजय पवार,रमेश सुतार,डी.आर.पाटील, डॉ.दगडू माने,विनोद पुजारी,बाळासाहेब कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.चंद्रकांत भाट यांनी आभार मानले.
Spread the love
error: Content is protected !!