उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी भेट दिली.दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते.महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. सरस प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी बनवलेल्या भरतकाम, हस्तकलेच्या विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. तसेच ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थही खवय्यांचे आकर्षणाचे केंद्र आहे.या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची अनोखी संधी या प्रदर्शनाद्वारे मिळते. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो याचा आनंद आहे.यावेळी अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन अदिती तटकरे यांनी केले.
