दुबैली गाड्यांच्या शर्यतीत आनंदा संकपाळ तर बिनदाती बैलगाडी शर्यतीत सनी गावडे यांची बैलगाडी प्रथम

श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशाह उरसानिमित्त आयोजित शर्यती उत्साहात
शिरोळ / प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसानिमित्त आयोजित केलेल्या गावातील दुबैली बैलगाडी शर्यतीमध्ये आनंदा संकपाळ यांची व घोडागाडी शर्यतीत बबलू शेट्टी तर बिनदाती व दोनदाती बैलगाडी शर्यतीमध्ये सनी उर्फ दादासो गावडे यांची बैलगाडी प्रथम आली शर्यती पाहण्यासाठी येथील मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे शर्यती शौकिकांनी मोठी गर्दी केली होती.
सोमवार दिनांक ४ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात पार पडला.यावर्षी उत्सव आणि उरूस साजरा करण्याचा मान संभाजीनगर येथील पवनपुत्र मित्र मंडळास मिळाला
मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी उत्सव व उरसाचे नेटके नियोजन केले होते.उरुसाच्या अगोदर चार दिवस शिरोळ परिसरात मोठा पाऊस झाला होता.यामुळे घोडागाडी व बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेल्या मैदानावर चिखल झाला होता.यामुळे उत्सव आणि उरसानिमित्त आयोजित केलेल्या घोडागाडी व बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या होत्या.सदरच्या शर्यती
आज बुधवारपासून शासनाच्या अटी शर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार विना लाठी विनाकाठी शर्यती येथील मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे घेण्यात येत आहेत.
बुधवारी गावातील बिनदाती व दोनदाती बैलगाडी गावातील घोडागाडी गावातील दुबैली गाडी या शर्यती उत्साहात पार पडल्या.या शर्यती पाहण्यासाठी सर्व शर्यतीशौकिकांनी आणि नागरिकांनी मिठारगी कनवाड रस्ता येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व बैलांची उत्सव व उरुस समितीच्यावतीने आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी पशुवैद्यकीय कक्षाने विशेष परिश्रम घेतले.मान्यवरांच्या हस्ते शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला.
प्रथमता गावातील बिनदाती व दोनदाती बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या.या शर्यतीमध्ये प्रथम सनी उर्फ दादासो गावडे, द्वितीय तुषार उर्फ पप्पू पाटील,तृतीय-अमर पाटील यांच्या बैलगाडीने अनुक्रमे यश मिळवले यानंतर गावातील घोडागाडी शर्यती झाल्या या शर्यतीमध्ये प्रथम बबलू शेट्टी द्वितीय सागर वडर तृतीय अण्णाप्रेमी यांच्या घोडागाडीने यश मिळवले.
गावातील दुबैली गाड्यांच्या शर्यतीमध्ये प्रथम आनंदा संकपाळ,द्वितीय असिफ कुरणे, तृतीय बाशू नाईकवडे यांच्या बैलगाडीने या मैदानात विजय मिळवला.यावेळी निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे,मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी,तलाठी संभाजी घाटगे, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव,विजय आरगे,उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे,
पंच कमिटीचे रावसाहेब देसाई धनाजी पाटील- नरदेकर, संभाजी जगदाळे,बाळासाहेब गावडे,धनपाल कनवाडे, जयसिंगराव देसाई,नायकू गावडे,बाशु नाईकवडे,भालचंद्र ठोंबरे,सिताराम शिंदे,चंद्रकांत भाट,उमेश माने,रविराज जगदाळे, संदीप चुडमुंगे,दिलीप संकपाळ,डॉ.आदेश गावडे,प्रवीण इंगळे,सूर्यकांत संकपाळ,विजय माने,रवींद्र गावडे,अजित चुडमुंगे,विकी शिंदे, तुषार पाटील,
प्रशांत जाधव,प्रसाद संकपाळ, धीरज शिंदे,अर्जुन जाधव,अजय सावंत,ओंकार गावडे,किरण गावडे,वर्धन रजपूत,निलेश गावडे, सागर भाट यांच्यासह सर्व पंच श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य
कार्यकर्ते आणि शर्यती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
Spread the love
error: Content is protected !!