कुरुंदवाड / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत सुरु असलेल्या ग्रामीण कृषि जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२३ -२४ अंतर्गत शरद कृषि महाविद्यालय जैनापूर (ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांचे जुने दानवाड मध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.शेतीविषयक नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान, कृषि जनजागृती तसेच कृषि कार्यानुभव यांचा अभ्यास करून शेतकर्यांना विविध पिकांचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करणार आहेत.यावेळी सरपंच सौ. राजश्री संजय तासगावे, उपसरपंच प्रवीण प्रकाश वडगावे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्यावेळी कृषिकन्यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील, ऋतिका पाटील , योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील, उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. व्ही.आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.