जनता दरबारात अर्जांचा जलदगतीने निपटारा – पालकमंत्री मुश्रीफ

कोल्हापूर येथे जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार पार पडला.जवळपास ११०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी २८२ हून अधिक अर्ज दाखल झाले.यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री या नात्याने मुश्रीफ यांच्या समोर मांडल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त,अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली,छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मागील जनता दरबारात ३३७ अर्ज सादर झाले होते, यातील सर्वांना संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाही बाबत लेखी स्वरुपात अवगत केल्याची माहिती यावेळी दिली.

Spread the love
error: Content is protected !!