केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांना आशा व गटप्रवर्तकांचे निवेदन

शिरोळ / प्रतिनिधी

 

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक राज्य समन्वयक नेत्रदिपा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज नृसिंहवाडी येथे केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांना आशा व गटप्रवर्तकांचे मानधन वाढीचा GR शासनाकडून लवकर काढण्यात यावा यासह विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.

 

आशा गटप्रवर्तकांचा समावेश NHM मध्ये करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करण्यात यावा,तसेच आशा व गट प्रवर्तक यांना 2018 पासून केंद्र सरकार कडून कोणतीच वाढ करण्यात आली नाही त्यात वाढ करून शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन किमान

 

वेतन लागू करण्यात यावे,तसेच आशा व गट प्रवर्तक यांचे कामावर आधारित मोबदला 2009 प्रमाणेच आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही तर सध्या स्थितीमध्ये महागाई निर्देशांक प्रमाने कामावर आधारित मोबदला देण्यात यावा,तसेच ऑनलाईन कामासाठी

 

आशा व गट प्रवर्तक यांना स्मार्ट फोन किंवा टॅब देण्यात यावे , नेट पॅक, रिचार्ज यासाठीचे निवेदन देण्यात आले, तसेच नुकतेच गारगोटी उपजिल्हा रुग्णालय उद्घाटन प्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री माननीय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनाही घोषित मानधन वाढ

 

शासन निर्णय करणे बाबत तेही निवेदन देण्यात आले होते, नोटिंग झाले असून लवकरच शासकीय निर्णय पारित करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

 

गटप्रवर्तक सीमा पाटील वसुधा कुरणे, रुपाली शहापुरे, भाग्यश्री नागावे अश्विनी जाधव व माया पाटील व सुरय्या तेरदाळे उपस्थित होत्या.

Spread the love
error: Content is protected !!