करा डोकेदुखीला…कायमच शांत! पहा आयुर्वेदिक उपाय

अर्धशिशी /मायग्रेन (Migraine )

अतिविचार,धावते युग,दुःख,स्पर्धा,दडपलेल्या भावना,तसेच एकाकिपणा या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर नकळत परिणाम होत असतो आणि त्यामुळेच अर्धशिशी / मायग्रेन चे प्रमाण फार वाढलेले आहे.या मध्ये व्यक्तीचे अर्धे डोके दुखते त्यालाच “मायग्रेन “म्हणतात.
कारणे –
अतिराग,डिप्रेशन,चिंता,शोक,आपोषक आहार, अतिमसालेदार,तेलकट,पित्तकारक आहार,AC, फॅनचा अतिवापर,बदलती जीवनशैली,जागरण.
लक्षणे –
अर्धे डोके दुखणे,चक्कर येणे,अस्वस्थ वाटणे, मळमळणे,अशक्तपणा.
अपथ्य(काय खाऊ नये )-
हरभरा,पावटा,वरणा,शेंगदाणे,वाळलेले खोबरे, ग्रेव्ही,तूर डाळ,पोहे,काजू,दही,खर्डा,साधे मीट,पापड,लोणचे, चहा,तिळ,मोहरी,लवंगा,काळी मिरी,नॉनव्हेज,पित्तकारक पदार्थ,थंड पाणी, वांग कोल्ड्रिंक.
पथ्य (काय खावे )-
ज्वारीच्या कण्या,ज्वारीच्या लाह्या,दुधीभोपळा, काकडी,बिट,गाजर,अक्रोड,बदाम,मनुके,खजूर, तूप, लोणी,ताक,घेवडा,शेवगा,मुगडाळ,भेंडी,गवारी, ढबूमिरची, कारले,पालेभाज्या,सफरचंद,चिकू,डाळिंब,पेरू,मोसंबी, लिंबू,नारळ पाणी, बडीशेप,कलिंगड
आयुर्वेदिक औषधे –
पथ्यादी काढा,शिरशूलादीवज्र रस, लघूसूतशेखर रस.
आयुर्वेदिक उपाय –
1) विरेचन,शिरोधारा, शिरोबस्ती,रक्तमोक्षण
2) सकाळी उठल्या उठल्या 1तांब्याभर गरम पाण्यात 1 लिंबू पिळून ते सर्व पाणी पिणे, एक तास काही खाऊ नये, यामुळे पोट साफ राहते, पित्त होत नाही.
3) आमलकी,यस्टीमधू,गुडूची, गोदंती,शंख भस्म,मौक्तिक कामदुधा,तुळस,ब्राम्ही,शंखपुष्पी, आश्वगंधा यांचे चूर्ण एकत्रित करून गरम पाण्यातून,दिवसातून 2 वेळा घेणे.
4) वेळेवर जेवण घ्यावे.
5) रोज महाशीर्ष मुद्रा करावी यासाठी काहीवेळ ध्यान कराव,त्यामुळे आपला श्वास,तोंड आणि त्या जवळच्या नसा शांत होतात.5-10 मिनिटे याच अवस्थेत बसल्याने तीव्र डोकेदुखीही थांबते.
6) आरोमा थेरपीमध्ये लवेंडर तेलाचे महत्व डोकेदुखीसाठी खूप आहे.
7) नाडी शोधन प्राणायाम व भ्रमरी प्राणायाम खूप फायदेशीर आहे
8) हस्तपादासन, सेतूबंधासन,शिशुआसन,मर्जरासन,
पच्चीमोत्तासन,अधोमुख श्वानासन,पद्मासन, शवासन हे योगाभ्यास नियमितपणे करावेत.
9) सकाळी व रात्री “पंचगव्य नस्य” नाकात 2-2थेंब टाकावे.
10) दीर्घ श्वास घ्या व सोडा.
11) कॉफीचे सेवन करा, त्यात कॅफेन नावाचा घटक डोके शांत करतो.
12) खोबरेल तेलात निलगिरी तेल मिसळून भुवयाच्या मधील बाजूस व कपाळावर मसाज केल्याने मायग्रेन थांबतो.
13) दररोज 1तरी सफरचंद व कलिंगड खावे.
14) या व्यक्तींनी तांबे धातूच्या भांड्यातील पाणी प्राशन करावे ते फायदेशीर आहे.
15) झोपण्यापूर्वी तिळ तेलाने तळपायाची मालिश करावी.
16) उन्हात जाऊन आल्यावर डोके दुखी चालू झाल्यास मेहंदी लावावी, त्वरित डोके दुखी थांबते.
17) कपाळावर सुंठ, वेखंड,जायफळ यांचा लेप उगळून लावल्यास हि मायग्रेन थांबते.
18) यात ॲक्युप्रेशर /ॲक्युपंक्चर चा हि चांगला उपयोग होतो.
19) दोन्ही नाकपुड्यात 2-2 थेंब शेवग्याच्या पानांचा रस टाकल्यास त्वरित मायग्रेन थांबते.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड
संपर्क -9175723404,7028612340
Spread the love
error: Content is protected !!