शिरढोण येथे साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक दि बा पाटील यांच्या हस्ते गौरव : साहित्य संमेलनातून वैचारिक मेजवानी
शिरोळ – प्रतिनिधी
शिरढोण (ता. शिरोळ) येथील साहित्य परिषद बहुद्देशीय संस्थेकडून शिरोळ येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ.दगडू माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई श्रीपती माने यांना आदर्शमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिराढोण येथील श्रीराम कुंज फार्म हाऊस येथे ज्येष्ठ साहित्यिक दि बा पाटील यांच्या हस्ते श्रीमती माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.दरम्यान माजी प्राचार्य डॉ राजेंद्र कुंभार,साहित्यिक दि बा पाटील यांनी आदर्शमाता पुरस्कार प्राप्त फुलाबाई माने यांच्या कार्याचे कौतुककरून मनोगतातून साहित्यिक विचारधारेची संमेलनात वैचारिक मेजवानी दिली.
शिरोळ येथील फुलाबाई माने यांनी पती कै.श्रीपती माने यांच्यासोबत शेती मशागतीच्या कामाबरोबरच साखर कारखान्याला बैलगाडीने ऊस तोडणी व वाहतुकीचे काम केले आहे.अपार कष्ट घेवून त्यांनी चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने व दोन मुलींना चांगले घडविले आहे.
यापूर्वी झालेल्या राजर्षि शाहू महोत्सव कार्यक्रमासाठी त्यानी स्वतःच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून लोकप्रबोधन महोत्सवाला प्रेरणा दिली असून त्यांना शाहू महोत्सव आयोजकाकडून कृतज्ञता सन्मान पुरस्कार तसेच कोल्हापूर येथील वंदुरे चॅरिटेबल ट्रस्टने आदर्शमाता पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
या संमेलनास सरपंच बाबासो हेरवाडे,पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी एम पाटील,उद्योगपती विनोद घोडावत,पोलीस पाटील अनुराधा जाधव,डॉ श्रीकांत पाटील,कल्लाप्पा टाकवडे,भूषण गावडे,डॉ.राजेंद्र कुंभार,
डॉ दीपक कोष्टी,रुस्तुम मुजावर,सागर आडगाणे,डॉ.दगडू माने,संगिता माने यांच्यासह साहित्यिक,कवी उपस्थित होते.स्वागत अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी केले.सचिव डॉ.कुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.उपाध्यक्ष दिलीप कोळी यांनी आभार मानले.