आता केसगळतीला करा फुलस्टॉप…पहा ‘हा’ व्हिडीओ

केस गळणे हे थायरॉईड,अशक्तपणा,ल्युपस,जागरण, बदलती जीवनशैली,अयोग्य आहार -विहारामुळेही होऊ शकते.

 

केस गळतीची कारणे –
अति उष्ण पदार्थ,जिवन सत्वांचा अभाव,जागरण, केसातील कोंडा,बोरवेलचे /क्षारयुक्त पाण्याचा वापर. ईर्ष्या, राग,चिंता, शोक,द्वेष,कठोर शाम्पू, केमिकल युक्त केस कलर,किमोथेरपी नंतर.अति गरम पाणी डोक्यावर घेणे हि सर्व कारणे केस गळतीसाठी कारणीभूत असतात.

लक्षणे – केस विंचरल्यानंतर सुरुवातीला कमी गळतात पण नंतर नंतर पुंजकाच हातात यायला लागतो, केस विरळ होणे, केस तुटणे. ठराविक जागी टक्कल दिसणे.

 

अपथ्य (काय खाऊ नये )-
पित्तकारक, शेंगदाणे, वाळलेले खोबरे, ग्रेव्ही, मुळा, अळू, पोहे, काजू, चहा, कॉफी, तिळ, मोहरी, काळी मिरी, लवंग यासारखे उष्णता वाढीवणारे पदार्थ,कोल्ड्रिंक,नॉनव्हेज, साधे मीट,दही,पापड,लोणचे,गव्हाचे अन्न.

 

पथ्य (काय खावे)-
तूप,लोणी,ताक,ज्वारीच्या कण्या,ज्वारीच्या लाह्या, उडदाची खिर,सैंधव मीट (उपवासाचे मीट)अळीव, राजगिरा लाडू, खारीक, खजूर,दूध,ओले खोबरे, लिंबू, डाळिंब, पेरू, चिकू, सफरचंद, मूग, कारले, शेवगा, ज्वारीची भाकरी, ढबू मिरची, घेवडा, भेंडी, गवारी, मेथी

 

आयुर्वेदिक औषधे –
आमलकी रसायन, यस्टीमधू, अश्वगंधा, मोरिंगा पावडर, सप्तामृत लोह, गुडूची सर्व एकत्रित करून गरम पाण्यासोबत घेणे.निल भ्रिंगराज तेल मालिश साठी वापरावे.

उपाय –
1) विरेचन कर्म,शिरोधारा, शिरोबस्ती.
2) आठवड्यातून एकदातरी डोक्यावरून कोमट पाण्याने अंघोळ करणे.
3) डोक्यावरून अंघोळ करताना शिकेकाई, रिठा, त्रिफळा, विडंग हि सर्व औषधे उकळून यांचा काढा बनवून डोके धुण्यासाठी वापरावे.
4) दिवसातून 2वेळा पंचगव्य नस्य /पंचेंद्रीय वर्धन तैल नस्य, दोन्ही नाकपुड्यात टाकावे.
5) खोबरेल, त्रिफळा, कडीपत्ता,निंब,जास्वंद फुल, वडाच्या पारंब्या,टंकण, यांचे तेल बनवावे व ते डोक्यात मुरवल्यास केस गळती थांबते.
6) पांढरे केस हाताने ओढू नयेत.
7) शिर्षासन,ससंगासन,अधोमुख स्वानाशन,वज्रसन,उत्तनासन हे योगाभ्यास नियमितपणे करावेत.
8) गवांकुर रस दररोज घ्यावा.
9) मनुके व बदाम रात्री 1 ग्लास पाण्यात भिजवून सकाळी खावेत.

 

डॉ.ओंकार अशोक निंगनुरे
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340

Spread the love
error: Content is protected !!