प्रा.डॉ.सौ.तेजश्री पाटील यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त

जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्रा.डॉ.सौ.तेजश्री आप्पासाहेब पाटील यांना विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल
युनिव्हर्सिटी, बेळगांव यांचेकडून डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. ‘वायरलेस सेन्सर नेटवर्क’ हे त्यांच्या संशोधनाचे क्षेत्र असून ‘ऑप्टीमायझेशन ऑफ पॉवर इन वायरलेस सेन्सर नेटवर्क’ या विषयावर त्यांनी सदरचे संशोधनाचे
कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. सदरच्या संशोधनामुळे सेन्सर नेटवर्क मध्ये उर्जेची भरपूर बचत होवून सेन्सर नोड्सचा उपयुक्त कार्यकाल जवळ जवळ तिपटीने वाढून गेला.तसेच नेहमीच्या बॅटरीज ज्या वातावरणाचे प्रदूषण
करतात,त्या ऐवजी त्यांनी हायब्रीड पॉवर सोर्स म्हणजे सोलार पी व्ही व विंड मिल डेव्हलप करुन त्यावर नेटवर्क चालवले.डॉ.सौ.पाटील यांच्या या संशोधन कार्याची दखल घेत ‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल
एज्युकेशन’,एआय.सी.टी.ई.,नवी दिल्ली या तंत्रशिक्षणाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी असलेल्या संस्थेने सुध्दा ‘वायरलेस सेन्सर नेटवर्क’ या दुर्मिळ अशा क्षेत्रातील प्रयोगशाळा त्यांना शासकिय निधीमधून
‘मॉडरॉब’ या योजनेखाली उपलब्ध करुन दिलेली असून याचा अनेक संशोधक विद्यार्थी डॉ.सौ.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनासाठी उपयोग करुन घेत आहेत.या क्षेत्रातील त्यांचा अनुभव प्रचंड असून त्यांनी
बरेचसे पेटंट्स मिळवले असून जवळजवळ 200 चे वर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध लिहिले आहेत.डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.श्री. विजयराज मगदूम,व्हाईस चेअरपर्सन सौ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर
डॉ.श्री. सुनिल आडमुठे यांनी त्यांना त्यांची पी.एच.डी.
पूर्ण झालेबद्दल व पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या संशोधन कार्यासाठी त्यांना डॉ.श्री.ए.डी.पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Spread the love
error: Content is protected !!