शिरोळ – जयसिंगपूर मार्गावरील युसूफ पेट्रोल पंपासमोर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटल्याने ट्रॉली उलटल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.या अपघातात प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली जयसिंगपूरच्या दिशेने जात असताना येथील युसूफपेट्रोल पंप समोर ट्रॉलीचा टायर फुटल्याने सदरची ऊसाची ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटली,असाच अपघात २२ वर्षांपूर्वी याच ठिकाणी झाला होता व त्या अपघात अनेक जखमी झाले होते तर दोन जणांना जीव गमवावा लागला होता. आजच्या अपघाताने २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताची आठवणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांतुन होत होती. आजचा अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मात्र या अपघातामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती.
