सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

जयसिंगपूर /  प्रतिनिधी
शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धरणगुत्ती येथे दि. १३ मार्च २०२१ रोजी सरकारी कामात अडथळा केल्याची फिर्याद सागर लक्ष्मण हेरवाडे याने शिरोळ पोलीस स्टेशन मध्ये दिलेली होती.त्यावेळी भाऊसो चिमाजी आरगे रा. धरणगुत्ती यांचेविरूध्द शिरोळ पोलिस ठाणेत भा.द.वि.क. ३५३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता.सदर खटल्याची सुनावणी मे.सत्र न्यायाधीशसो जयसिंगपूर यांचे कोर्टात झाली.या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे साक्षीदार व पुराव्यांची तपासणी झाली. आरोपीचा वतीने अॅड. गुरुनाथ माने यांनी जोरदार युक्तिवाद केला.अॅड.गुरुनाथ माने यांचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.सत्र न्यायाधीशसो श्री.जी.बी.गुरव यांनी या खटल्यातील आरोपी भाऊसो आरगे याची निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड.गुरुनाथ दिनकरराव माने व अॅड. ऋषीकेश देवाप्पा गावडे दानोळी यांनी काम पाहिले.
Spread the love
error: Content is protected !!