हेरवाड हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सवास प्रारंभ

कुरुंदवाड : प्रतिनिधी

खेळ खेळताना हार जीत होत राहते.हार झाली तरी निराश न होता आणि विजय झाला तर हुरळून न जाता निकाल स्विकारण्याची मानसिक तयारी ठेवणे हेच खेळाडूंच्या जीवनात प्रगतीपथावर नेते असे असे मार्गदर्शनपर मौलिक विचार हेरवाड गावचे तंटामुक्त अध्यक्ष सुभाष देबाजे यांनी व्यक्त केले.हेरवाड हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कुलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे होत्या.

हेरवाड हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.महोत्सवाची सुरुवात प्रार्थनेने झाली.यावेळी तंटामुक्त।अध्यक्ष सुभाष देबाजे व सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे यांचा हस्ते करण्यात आला.सुत्रसंचलन, पाहुण्यांची ओळख धनंजय धोत्रे यांनी करुन दिली. आभार सहायक शिक्षक जमीर मुल्ला यांनी मानले. यावेळी क्रीडा शिक्षक अजीत दिवटे,सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी हजर होते.

Spread the love
error: Content is protected !!