शिरोळ श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी ; गुरुवार पर्यंत होणार विविध कार्यक्रम

शिरोळमध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात

श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात दर्शनासाठी गर्दी ; गुरुवार पर्यंत होणार विविध कार्यक्रम

शिरोळ /  प्रतिनिधी

 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा….. श्री गुरुदेव दत्त….. असा जयघोष करीत शेकडो भाविकांनी येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात श्री चे दर्शन घेतले. यावेळी श्रींचा जन्मोत्सव सोहळा अमाप उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. मंदिरात दर्शनासाठी अबाल वृद्धासह भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शिरोळ येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र उत्सव समितीने सोहळ्याचे आयोजन केले होते.येथील श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्त गुरुवारी २८ डिसेंबर पर्यंत धार्मिक कार्यकम आहेत. मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजता काकड आरती व नित्य पूजा झाली.त्यानंतर दुपारी ठीक १२ वाजून १५ मिनीटानी मंदिरामध्ये श्रींचा जन्मकाळ मोठ्या उत्साहात व असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. श्रीदत्त नामाचा जागर करीत भाविकांनी मनोभावे श्री ची आराधना केली.
सायंकाळी धूप ,अभिषेक,महापुजा सोहळा पार पडला.
यावेळी मुख्य पुजारी सर्वेष अजित कुलकर्णी, वेदमूर्ती अनिकेत जोशी महाराज, चैतन्य चारुदत्त कुलकर्णी, स्वानंद कुलकर्णी,श्रेयस देशपांडे,अनुज अवधूत देशिंगकर, गुरुप्रसाद दीपक कुलकर्णी, इंद्रसेन अनिकेत जोशी तसेच दत्तगुरु भोजनपात्र मंदिर सेवेकरी यांच्यासह महिला व पुरुष भाविक यांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात सेवा भावाने दत्त जयंती उत्सव संपन्न झाला.

Spread the love
error: Content is protected !!