शिरोळ / प्रतिनिधी
नृसिंहवाडी कोल्हापूर एस टी बसमध्ये चढत असताना विश्वनाथ बाळकृष्ण पवार यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची दिड तोळ्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवार दि . २६ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली याबाबती फिर्याद विश्वनाथ बाळकृष्ण पवार रा मुंबई यांनी शिरोळ पोलीसात दिली आहे .
शिरोळ पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विश्वनाथ पवार हे नृसिंहवाडी येथुन कोल्हापुर येथे जाणारे बसमध्ये गर्दी असल्याने हातातील बँगेसह गडबडीत वाट काढुन चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत विश्वनाथ पवार यांचे गळ्यातील दिड तोळ्याची सोन्याची लंपास केली असुन शिरोळ पोलीसात या बाबत अज्ञात चोरट्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे .