22 डिसेंबर हा दिवस थोर भारतीय गणिततज्ञ डाॅ. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दानोळी हायस्कूल दानोळी मध्ये गणित दिनानिमित्त विविध स्पर्धा व उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. रुगे सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी रामानुजन यांचे जीवन कार्य व गणितीय गीत सादर केले. गणितीय शास्त्रज्ञांची माहिती व जीवन कार्य यांचे भित्तिपत्रक तयार केले होते. याचबरोबर इयत्ता पाचवी व सहावी साठी गणितीय बहुपर्यायी प्रश्न चाचणी, इयत्ता सातवी व आठवी साठी गणितीय प्रश्नमंजुषा स्पर्धा व इयत्ता नववी साठी गणितीय रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले होते.यासोबतच गणितीय साहित्य प्रदर्शन ही भरवण्यात आले होते. सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गणित विभाग प्रमुख श्री. भुसाण्णा सर यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. माननीय मुख्याध्यापिका सौ. वांजुळे मॅडम व पर्यवेक्षक श्री. कारंडे सर यांचे स्वागत श्री भुसाण्णा सर यांनी केले. सर्व कार्यक्रम व स्पर्धा पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अनमोल सहकार्य केले. सूत्रसंचालन श्री लंबे सर यांनी केले व आभार सौ. सुतार मॅडम यांनी मानले.
