आयोध्यातील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेसाठीच्या अक्षता कलशाची शिरोलीत मिरवणूक

पु.शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
आयोध्यातील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी आयोध्याहुन आलेल्या अक्षता कलशाची मिरवणूक शिरोली पुलाची इथं मोठ्या उत्साहात सर्वांचे काढण्यात आली.
हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची इथं सकल हिंदु समाजाच्या वतीने अयोध्येतील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेसाठी पुजित केलेल्या अक्षता कलशाचीं भव्य मिरवणूक काढण्यात आली. 31 वर्षापूर्वी आयोध्येत कारसेवक म्हणून गेलेले विठ्ठलराव पाटील,उत्तम पाटील, निवृत्ती कुंभार,आकाराम माळी,आणि नंदू जाधव यांच्या हस्ते ध्वज पूजन करून शिरोली फाटा इथून मिरवणुकीला सुरुवात झाली.हलगी वाद्यासह वारकऱ्यांनी प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर भजन गात मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला.ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या हस्ते भगव्या ध्वजाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात येत होते.मिरवणुकीमध्ये सहभागी ग्रामस्थांनी जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.मिरवणूक हनुमान मंदिरात आल्यानंतर आरती करण्यात आली.त्यानंतर ग्रामपंचायत चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ध्येय मंत्रच पठण करण्यात आले.त्यानंतर ही मिरवणूक श्री महादेव मंदिरात आली.या ठिकाणी कलश विराजमान करण्यात आले.महाआरती नंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.एक जानेवारीपासून या मंगल अक्षता घरोघरी वाटप करण्यात येणार आहेत.या मिरवणुकीमध्ये सकल हिंदू समाजाबरोबरच शिरोली ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
Spread the love
error: Content is protected !!