शिरोळमधील तरुण मंडळाच्या वतीने श्री दत्त भक्तांना अल्पपोहाराचे वाटप

शिरोळ / प्रतिनिधी

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शिरोळ मधील राजा शिवछत्रपती तरुण मंडळ आणि जय हिंद मित्र मंडळाच्या वतीने अल्पपोहार आणि दुधाचे मोफत वाटप करण्यात आले गेली १० वर्षाहून अधिक काळापासून प्रत्येक दत्त जयंती निमित्त हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे
श्री दत्त जयंती निमित्ताने नुसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी सोमवारी रात्रीपासून हजारो दत्तभक्त पायी चालत येत होते या भाविकांना युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अल्पोपहार व दुधाचे वाटप करून या भाविकांची सेवा केली या कामी राजा शिवछत्रपती तरुण मंडळ आणि जय हिंद मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सोमवारी रात्रभर येणाऱ्या भाविकांना अल्पोपहार देण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी मंडळाचे राहुल यादव,दत्तात्रय काळे,दीपक भाट,अनिल काळे,उमेश गावडे,अंकुश काळे,दत्तात्रय बाबर,धनाजी गावडे,दत्तात्रय पाटील-बारवाडकर, तानाजी बाबर, लालासो गावडे,पारस भाट, संदीप गावडे,नवनाथ भाट, प्रसाद यादव, सौरभ काळे, सागर काळे,तानाजी काळे यांच्यासह दोन्ही मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!