जयसिंगपुर श्री स्वामी समर्थ मंदिरात रुद्रयाग व मल्हारीयाग संपन्न
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ दरबार येथे दत्त जयंती निमित्त अखंड नाम,जप यज्ञ याग सप्ताहाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे करण्यात आले आहे.सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पहाटे ५. वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता.सुपाली आरती त्यानंतर मल्हारी सप्तशती ग्रंथाचे वाचन करन मल्हारी भाग संपन्न झाला.यळकोट यळकोट जय मल्हार,खंडेराव महाराज की जय जयजयकार करत भंडारा उधळत भक्तीमय वातावरणात याग संपन्न झाला.सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा,नैवद्य आरती, सायंकाळची नित्यसेवा इ.सेवा करण्यात आली.श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन व आर्शिवाद घेण्यासाठी जयसिंगपूर सह पंचकृषीतील स्वामी भक्तांनी नदी भक्त उपस्थित होते.उद्या दि.२६ रोजी दुपारी १२.३९ वा दत्तजन्मोउत्सव होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भावीकांना दर्शनासाठी LED स्क्रीन,पार्कंग,पिण्याचे पाणी,चप्पल स्टॅन्ड सुविधा आदिचे नियोजन मंदिराच्या वतिने करण्यात आले आहे,तरी सर्वांनी दत्तजन्मोउत्सव साठी उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले.