नृसिंहवाडी दत्तधामात गुंजला येळकोट…येळकोट…जय मल्हारचा जयघोष

नृसिंहवाडी / प्रतिनिधी
नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात  दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज येळकोट…येळकोट…जय मल्हारच्या जयघोषात भंडाराची उधळण करीत श्री रुद्र याग,मल्हारी याग ,विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले.आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली  दत्तजंयतीनिमित्त दत्तधाम येथे सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज हजारो सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत कुलदेवतांची विशेष सेवा करण्यात आली.यामध्ये याज्ञिकी विभागाकडुन श्रीसुक्त,रामरक्षा,द्वादश ज्योर्तिलिंग स्त्रोत्र,अमृत संजिवशी मंत्र,संजीवनी मंत्र,शिवमहिम्न, कालभैरवाष्टक आदी स्त्रोत्र व मंत्र,तसेच श्री रुद्राध्यायाचे वाचन करीत हवनयुक्त श्री रुद्रयाग झाला.यानतंर मल्हारी सप्तशतीच्या चौदा अध्यायाचे वाचन करीत प्रत्येक ओवीला हवनयुक्त स्वाहाकार करण्यात आला.श्री मल्हारी सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायानतंर हवनामध्ये विडे अर्पण करताना सदानंदाचा..येळकोट… येळकोट…येळकोट… जय मल्हार…श्री खंडेराव महाराज की जय चा  जयघोष करीत  शंखनाद व वाद्यांच्या गजरात भंडाराची उधळण करीत श्री मल्हारी याग संपन्न झाला.यागापुर्वी सेवाकेंद्राच्या याज्ञिकीविभागाच्या शास्त्रीनी कुलदेवतांची विशेष सेवा कशी करावी त्याची महती व महत्व अंत्यत सोप्या शब्दात सर्व सेवकर्‍यांना समजावुन सांगितले. तत्पुर्वी आज सप्ताहाच्या  सहाव्या दिवशी सकाळी  आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले.मान्यवरांच्या हस्ते साडेदहाची नैवेध आरती झाली.आरतीनतंर सामुहिक श्री स्वामी समर्थ मंत्र,रामरक्षा,हनुमान चालीसा पठण करण्यात आले.यानतंर यज्ञ विभागात षोडोपचारे  पुजा व नित्य स्वाहाकार करण्यात आला.दुपारच्या सत्रात श्री दुर्गासप्तशती पाठ व श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे वाचन करण्यात आले.पाच वाजता शिवलिंगावर दहीभात लेपन करुन १०८ शिव नामावलीचे पठण करीत बिल्वार्चन करण्यात आले.यानतंर खोबरे -भडांराची उधळण करीत तळीभडांराचा कार्यक्रम सर्व सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात झाला.सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा करण्यात आली.साडेसहा वाजता नैवेध आरती झाली.सात वाजता विविध विषयावर मान्यवंराचे मार्गदर्शन झाले.सांयकाळच्या सत्रात सप्ताहाकाळातील नित्यध्यान,श्री विष्णुसहस्त्रनाम  स्त्रोत्रपठण ,गीतेचा पंधरावा अध्याय,रामरक्षा ,हनुमान चालीसा पठण आदी सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.उद्या दत्तजयंती असल्यामुळे दुपारी १२ वाजुन ३९ मिनिटानी श्री दत्त जन्मोत्सव होणार आहे.

सप्ताहाकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामीसेवक, भक्तानी लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
error: Content is protected !!