नृसिंहवाडी / प्रतिनिधी
दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.दत्त देवस्थान च्या वतीने दक्षिण आणि उत्तर घाटावर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रेकसू फोर्स, पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ग्रामपंचायतच्या वतीने पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी अदि व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असल्याचे दत्त देवस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी बोलताना सांगितले.