जिल्हास्तरीय एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत सौ जयश्री पाटील प्रथम

शिरोळ / प्रतिनिधी

 

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित , कोल्हापूर ” व महिला सखी मंच ” यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘एकपात्री नाट्यछटा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मौजेआगर या शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ जयश्री पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेवेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने , उपशिक्षणाधिकारी भिमराव टोणपे,सौ.सविता पाटील , शिक्षक नेते तथा तज्ञ संचालक दादासो लाड,संस्थेचे चेअरमन म लक्ष्मण डेळेकर,व्हा चेअरमन प्रकाश कोकाटे, कागलचे माजी उपनगराध्यक्ष सुनिल माळी तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोल्हापूर जिल्हातून अनेक सभासद महिला (शिक्षिका )या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या.न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर या विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ.जयश्री पाटील यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर जिल्हास्तरीय एकपात्री नाट्यछटा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला.त्यांना विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ आगरभाग संचलित न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर या संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील,उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे,सचिव मेजर के.एम.भोसले, खजिनदार कृष्णात पाटील सर्व संचालक मंडळ व विद्यालयाचे मुख्याध्यापक खंडेराव जगदाळे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!