कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील सलगर-पाचमैल या महामार्गावरती चार चाकी व मोटरसायकल मध्ये जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातातील जखमी युवकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कोमल हुव्वाप्पा कांबळे (वय40 रा.नवे.दानवाड, असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान चुकीच्या दिशेने येऊन अपघात करून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी चारचाकी चालक मौला मेहबूब जुगळे (रा.निपाणी ता.निपाणी,जि. बेळगांव) याच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुरुंदवाड येथील अनिश हॉस्पिटल समोरील सलगर-पाचमैल राज्य मार्गावर रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मयत कोमल कांबळे हा हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक(एम.एच.09इ.जि 8319)वरून हेरवाडकडे जात असताना यातील संशयित आरोपी मौला जुगळे हा चार-चाकी तवेरा क्र(एम.एच 05.आर.3646) कुरुंदवाडकडे येत असताना चुकीच्या दिशेने येऊन कांबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.या अपघातात कांबळे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.उपचारादरम्यान सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला.