बोरगाव येथे प.पू.शांतानंद महाराज यांचे २१ वी पुण्यतिथी धार्मिक वातावरणात साजरी

बोरगाव येथे प.पू.शांतानंद महाराज यांचे २१ वी पुण्यतिथी धार्मिक वातावरणात साजरी
बोरगांव / प्रतिनिधी
बोरगाव येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिराचे विश्वस्त आणि जीर्णोधारक परमपूज्य  शांतानंद महाराज यांची २१ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली.देवपुरुष म्हणून नावरूपास आलेल्या परमपूज्य शांतानंद महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पहाटे मंदिरात महाअभिषेक,रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आले.त्यानंतर महाराजांच्या मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आले.शहरातील प्रमुख मार्गाहून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आले.वारकरी यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण शहरातून पालखी मिरवणूक झाल्यानंतर आरती करण्यात आले.आरती नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.समस्त ज्योतिर्लिंग भक्त मंडळ यांच्या सहकार्याने पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमातून साजरी करण्यात आली.यावेळी बोरगावसह कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!