चंदन झाडांच्या चोरीने ‘या’ ग्रामीण रुग्णालयात उडाली खळबळ

दानवाड / प्रतिनिधी
नवे दानवाड येथे ग्रामीण रुग्णालय शेजारी असणाऱ्या २० हजार रुपये किंमतीच्या चंदनाच्या झाडांची बुंदे अज्ञातांनी मध्यरात्री कटरच्या साह्याने कट करून चोरुन नेल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली.याबाबतची वर्दी रुग्णालयातील कर्मचारी आणि सादिक नदाफ यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, नवे दानवाड येथे आरोग्य उपकेंद्रात शेजारी दोन चंदनाची झाडे होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १४ रुंदीचा व ७ ते ८ फूट लांबीचा १२ हजार रुपये किमतीचा चंदनाच्या झाडाचा बुंदा तसेच ८ हजार रुपये किमतीचा ७ ते ८ इंच रुंदीचा अशी दोन चंदनाचे झाडे तोडून त्यांचा बुंदा असा एकुण २० हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या चंदन चोरीची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेऊन पंचनामा केला.यावेळी पोलीस पाटील डॉ.स्वाती कुन्नुरे, सरपंच डॉ.सी डी पाटील,व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!