महाडिक-मुश्रीफ यांच्या बुलेट राईडमुळं कोणाची धाकधूक वाढणार

कोल्हापूर / प्रतिनिधी
खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री हसन मुश्रीफ या दोघांची आजची एकत्र घेतलेली बुलेट राईड राज्यात चर्चेची ठरली.कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील नवीन वाहने हस्तांतरण कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमावेळी हसन मुश्रीफ यांनी बुलेट चालवावी अशी विनंती भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी केली,त्यांच्या विनंतीला मान देऊन बुलेट चालवण्याचे ठरलं व मुश्रीफ यांनी एक अट घातली की धनंजय महाडिक यांनी बुलेट चालवावी तर मी रपेट मारीन तेंव्हा महाडिक बुलेटला थेट किक मारली,तर जवळच असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे महाडिक यांच्या मागे येऊन बसले.या दोन्ही नेत्यांनी पोलीस मैदानावरती बुलेटवर एक फेरी देखील मारली.या खासदार – आमदारांच्या बुलेट राइडचा व्हिडिओ राज्यात चर्चेत आला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत दोघेही खांद्याला खांदा लावून एकदिलाने लढणार असल्याचे संकेत दिलेत.
Spread the love
error: Content is protected !!