सैनिक टाकळी / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी ते कर्नाटक चंदुरटेक या दोन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे काम पूर्णत्वास येत असून पुलाला जोडणाऱ्या मार्गाच्या जागेसाठी भूसंपादनाची नोटीस जारी करण्यात आली आहे.इचलकरंजी उपविभागातील तहसिल व तालुका शिरोळ पैकी मौजे टाकळी येथील जमीन कृष्णा नदीवरील चंदूर टेक ते सैनिक टाकळी पुलाच्या मार्गासाठी आवश्यक असलेली जमीन खाजगी वाटाघाटीने अथवा थेट खरेदी पध्दतीने सार्वजनिक प्रयोजनासाठी खरेदी करणेचे प्रस्तावित केलेले आहे.संबंधित जमीन मालकाचे नाव,गट नंबर व संपादन क्षेत्र इत्यादी तपशिला नुसार ही जमीन संपादित केली जाणार आहे.सदर जमीनीबाबत जमीन मालकाच्या हिस्स्यावर इतर कोणाचा हितसंबंध अधिकार असलेस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांचे आत पुराव्यानिशी लेखी तक्रार कार्यालयीन वेळेत समक्ष अथवा रजिस्टर्ड पोष्टाने उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी उपविभाग इचलकरंजी याना कळवावे लागणार आहे.एकुण ८ गटा पैकी ३० गुंठे जमीन संपादित केली जाणार आहे.यामध्ये २६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.