दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री चंडी याग संपन्न
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी( दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज हजारो सेवेकर्यांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशतीचे वाचन करीत श्री चंडी याग व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या पाचव्या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील छत्तीस ते अडतीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले. मान्यवरांच्या हस्ते नैवेध आरती झाली. आरतीनतंर सामुहिक श्री स्वामी समर्थ मंत्र, रामरक्षा,हनुमान चालीसा पठण करण्यात आले.
यानतंर यज्ञ विभागात षोडोपचारे पुजा व नित्य स्वाहाकार करण्यात आला.आज श्री चंडी यागापुर्वी दिंडोरीप्रणित याज्ञिकी विभागाकडुन या आई भगवती ची सेवा म्हणजेच आपल्या कुलदेवताची सेवाआहे.या सेवेची महती,महत्व व लाभ अतिशय सोप्या भाषेत समजावुन सांगण्यात आला.यागापुर्वी नवार्णव मंत्राचे पठण करण्यात आले.यानतंर श्री दुर्गा सप्तशतीतील तेरा अध्यायाचे वाचन करीत प्रत्येक ओवीला हवनयुक्त स्वाहाकार करण्यात आला.प्रत्येक अध्यायानतंर वाद्यांच्या गजरात उदयोस्तु….श्री महाकाली….महालक्ष्मी….महासरस्वती….श्री अंबामाता की जय….असा जयजयकार करीत अकरा अलंकार अर्पण करीत स्वाहाकार करण्यात आला.यानतंर श्री यंत्रावर कुकुंमार्चन ची सेवा करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने महिला सेवेकरी उपस्थितीत होत्या.दुपारच्या सत्रात श्री दुर्गासप्तशती पाठ व श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे वाचन करण्यात आले.सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा करण्यात आली. साडेसहा वाजता नैवेध आरती झाली.सात वाजता विविध विषयावर मान्यवंराचे मार्गदर्शन झाले.सांयकाळच्या सत्रात सप्ताहाकाळातील नित्यध्यान,श्री विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्रपठण ,गीतेचा पंधरावा अध्याय,रामरक्षा,हनुमान चालीसा पठण आदी सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.सप्ताहामुळे मंदिरात अखंड 24 तास प्रहर सेवा सुरु आहे.आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक सह,नृसिंहवाडी, पीठापूर,गाणगापूर,तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाचवेळी दत्तजंयतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताह,विविध सेवा श्री स्वामी चरणी रुजु करण्यात येत आहेत.सप्ताहाकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामीसेवक,भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकांना सप्ताहाकाळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य,वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,(दत्तधाम ) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.