अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कागल / प्रतिनिधी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू, अशी ग्वाही दिली. कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित मोर्चासमोर बोललो.संघटनेच्यावतीने मला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये खालील मागण्यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे वैधानिक असून त्यांना वेतनश्रेणीसह ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी आदी लाभ द्या. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये व मदतनिसांना दरमहा २० हजार रुपये मानधन द्या. महागाई निर्देशांकानुसार दर सहा महिन्यांनी मानधनांमध्ये वाढ करा. महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल कडून अंगणवाड्यासाठी पाच हजार ते आठ हजार भाडे मंजूर करावे. आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प आहे, त्यामध्ये वाढ करून सर्वसाधारण बालकांसाठी १६ रुपये व अति कुपोषित बालकांसाठी २४ रुपये करावा.यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील, कॉम्रेड आप्पा पाटील, विद्या कांबळे, सुरेखा कांबळे, शमा पठाण, अर्चना पाटील, उज्वला बंडगर, अनिता माने, भारती कुरणे आदी पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!