सेवाभाववृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहीजे – आमदार प्रकाश हुक्केरी

अंकली / प्रतिनिधी
वैद्यकीय पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा बजावताना समाजामध्ये सेवाभाववृत्ती बाळगून समाजाची सेवा केली पाहीजे.वैद्यकीय सेवेमध्ये अमिषाला बळी न पडता आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा.असे मत आमदार प्रकाश हुक्केरी यांनी व्यक्त केले.अंकली येथील गोमटेश शिक्षण संस्थेच्या डॉ.एन.ए.मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या व्दितीय बॅचच्या  बी ए एम एस विद्यार्थ्यांचा पदवीदान (विशिखानुप्रवेश) समारंभात प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.कार्यक्रमात आमदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, डॉ.एन.ए.मगदूम यांनी संस्थेचा नावलौकीक वाढवला असून संस्थेच्या पुढील कार्यास सर्वतोपरी सहकार्य करू असे त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ.एन.ए.मगदूम उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमित घाटगे,डॉ एस व्ही गद्दीहळ्ळीशेट्टी, चिक्कोडी जिल्हा कॉंग्रेस कमीटी अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे,पंकज पाटील,  महावीर मोहीते उपस्थित होते.संस्थेच्या खजिनदार ललिता मगदूम,सचिव सुरेश चौगुले, अधिष्टाता अजित रावळ यांची प्रमूख उपस्थिती लाभली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.लक्ष्मण चिंगळे,अमित घाटगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.श्रीदेवी पिरजे पाटील हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.अमित घाटगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले सध्या स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी आपल्या पेशाचा सन्मान करावा व समाजाप्रती कृतज्ञ राहून कार्य करावे.असा मौलिक सल्ला दिला.लक्ष्मण चिंगळे यांनी डॉ एन ए मगदूम यांच्या कार्याचे कौतूक केले. जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून सध्याच्या काळात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाला महत्त्व देऊन पुढील वाटचाल सुरू ठेवावी आपल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व बनण्याचा प्रयत्न करावा यासाठी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा असे डॉ एन ए मगदूम यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.कार्यक्रमात प्राचार्य डॉ रमेश कोनकेरी यांनी स्वागत केले.प्रतिज्ञा वाचन डॉ विवेक सोलापूरकर यांनी केले.यावेळी सर्व विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी पालक उपस्थित होते.
Spread the love
error: Content is protected !!