बाहुबली कुंभोज रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार कधी ?

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे 

बाहुबली कुंभोज रोडची अत्यंत दुरावस्था झाली असून, विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांनी सदर रस्ता दुरुस्त करण्याची आश्वासने दिली होती, काही नेत्यांच्या हस्ते सदर असतात कामाचा शुभारंभ झाला होता परिणामी निवडणूक झाली ,शपथविधी झाला तरीही अद्याप सदर रस्याचे काम कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.सदर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात विद्यार्थींची व बाहुबलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची वाहतूक होत असल्यामुळे सध्या रस्ता दुरुस्त करणे ही शासनाची जबाबदारी असून त्यामध्ये लोकप्रतिनिधींनी वेळेस लक्ष घातले गरजेचे आहे .परिणामी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार राहुल आवडे यांनी उद्घाटन करून निवडणुकीनंतर सदर रस्ता तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.परिणामी आता निवडणुका झाल्या शपथविधी झाला आता हा रस्त्याचे काम कधी सुरू होणार याकडे बाहुबलीसह कुंभोज परिसरातील ग्रामस्थांची लक्ष वेधले असल्याचे चित्र दिसत आहे.

error: Content is protected !!