महास्वामीजींच्या सानिध्यात गीता आश्रम मठ सदलगा येथे गीता जयंती उत्साहाने साजरी

महास्वामीजींच्या सानिध्यात गीता आश्रम मठ सदलगा येथे गीता जयंती उत्साहाने साजरी

सदलगा शहर प्रतिनिधी / अण्णासाहेब कदम
सदलगा ता.चिकोडी येथील गीताश्रम मठ येथे काल परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंदजी स्वामी गीताश्रम मठ सदलगा यांच्या अध्यक्षतेखाली आणि परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी समाधी मठ निपाणी,परमपूज गिरीश आनंद स्वामीजी ज्ञानयोग आश्रम विजयपूर,परमपूज्य सदाशिवआनंद स्वामीजी गोडवाड,परमपूज्य रुद्र मुनी स्वामीजी बाबा महाराज मठ दत्तवाड यांच्या दिव्य सानिध्यात काल मोठ्या भक्ती भावाने गीता जयंती कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी भगवत गीतेचे महत्व,भगवद्गीतेचा कथासार आणि मानवी आचरण आदर्श कसे असावे या सर्व घटकावर उपस्थितांनी आपले विचार व्यक्त करून समाजाला प्रबोधन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात परमपूज्य डॉ. श्रद्धानंद महास्वामीजी यांनी भगवद्गीता व मानवी जीवन यांचा स्नेह संबंध,जीवनात गीतेतील प्रत्येक प्रसंगाचा कसा उपयोग होतो व जीवन कसे आनंदी आणि समृद्धीने संपन्न करावे  हे समजावून सांगितले. संपूर्ण विश्वात आदर्शवत असलेला ग्रंथ म्हणजे “भगवद्गीता” याचे वाचन लहान थोर सर्वांनी आवर्जून केले पाहिजे, ही काळाची गरज आहे,असे सांगितले.त्याचबरोबर शांत व संयमाने रहा आनंदी जीवन जगा असा संदेश यावेळी महास्वामीजीनी दिला.या गीता जयंती कार्यक्रमासाठी सदलगा व परिसरातील अनेक खेड्यातील शेकडो महिला, अबाल वृद्ध व शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Spread the love
error: Content is protected !!