जोल्ले ग्रुप तर्फे निपाणी ते अंजनाद्री पर्वत दर्शनासाठी १७०० हनुमान भक्त यात्रेला रवाना

निपाणी /  प्रतिनिधी
जोल्ले ग्रुप तर्फे आयोजित निपाणी ते अंजनाद्री पर्वतासाठी हनुमान भक्तांची हनुमान माला या धार्मिक यात्रेला आज रवाना झाले.समाधी मठाचे परमपूज्य श्री.प्राणलिंग महास्वामीजी यांच्या हस्ते भगवा ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला.म्युनिसिपल हायस्कूल निपाणी येथून १७०० भाविकांनी ३३ बसेस मधून अंजनाद्रीला प्रस्थान केले.त्यापूर्वी सर्व भाविकांनी आपापल्या गावामध्ये होम करून , माला व भगवी वस्त्रे परिधान करून हनुमंताचे तीन दिवसांचे व्रत प्रारंभ केले होते.या व्रताची सांगता उद्या अंजनाद्री पर्वतावर हनुमंताच्या दर्शनानंतर होईल.चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणीच्या आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रोत्साहनामुळे गेली दोन वर्षे निपाणीमधून हनुमान भक्तांची चांगली सोय करण्यात येत आहे.यंदादेखील बसेस आणि उपहाराची सोय बसमध्येच करण्यात आली असून अत्यंत चांगल्या प्रकारे शिस्तबद्धतेने हनुम माला उपक्रम पार पाडावा अशा शुभेच्छा प्राणलिंग स्वामींनी याप्रसंगी दिल्या.यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, राजू गुंदेशा,समित सासणे,प्रणव मानवी,बंडा घोरपडे,संतोष सांगाववकर,अभि मुदकुडे, श्रीकांत बन्ने,विजय पावले,प्रशांत केस्ते,प्रसाद औंधकर उपस्थित होते.जोल्ले ग्रुपचे इव्हेंट डायरेक्टर विजय राऊत यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.
Spread the love
error: Content is protected !!