डॉ.अरविंद माने बनले सर्वसामान्य नागरिकांसाठी गोल्डन मॅन

शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे प्रभागातील नागरिकांना मोफत गोल्डन आयुष्यमान कार्ड काढून देण्याचा उपक्रम ठीक ठिकाणी राबवत आहेत.या उपक्रमास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून डॉ माने यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शिरोळ नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपताच अनेक नगरसेवकांनी शहरातील मूलभूत समस्यांच्याकडे व जनसेवेकडे दुर्लक्ष केले मात्र याला अपवाद आहेत.ते माजी नगरसेवक डॉ अरविंद माने डॉ माने यांनी आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना शासनाच्या आरोग्य सेवेचा लाभ व्हावा यासाठी आवश्यक असणारे गोल्डन आयुष्यमान कार्ड मोफत वितरण करण्याचा उपक्रम राबवून नेहमीच जनसेवेसाठी तत्पर आणि कटिबद्ध असल्याचे सिद्ध केले आहे.
शहरातील संगमनगर परिसरातील नागरिकांना गोल्डन आयुष्यमान कार्ड मिळावे यासाठी माजी नगरसेवक डॉ अरविंद माने यांनी येथील सामाजिक सभागृहात गोल्डन आयुष्यमान कार्ड मोफत काढून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याचा शुभारंभ जायटसं ग्रुप ऑफ शिरोळ सहेलीच्या अध्यक्षा सौ.सारिका अरविंद माने यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यावेळी सी.एस.सी.प्रमुख अंजली पैलवान व विलास रजपूत  हे गोल्डन आयुष्यमान कार्ड नागरिकांना काढून देत आहेत.श्रेणिक माने,राघव सुतार, सुशील पाटील,दगडु जाधव,आदर्श माने,ऋषी माने,रोहन माने,महादेव माने,प्रमोद भोसले, प्रभाकर स्वामी,सचिन कोळी,सागर काळे, दादासो आवळे,प्रविण आवळे,तुषार आवळे, प्रसाद आवळे,सतीश भोरे,प्रकाश आवळे,सुनील आवळे, संजय भोरे,शशिकांत आवळे,बाळासो आवळे, सतिश वयंदडे,नितीन आवळे,पुंडलिक आवळे,चंद्रकांत आवळे,सुकुमार आवळे राहुल माने यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Spread the love
error: Content is protected !!